शहारली तर तु ही होतीस
नि घाबरलो तर मी ही होतो
नसतीलच पाहिले भाव
चेहऱ्यावरचे माझ्या तू,
पण ....
जशी गोंधळलेली तू होतीस....
तसा संभ्रमात तर मी ही होतो
झालं तर काहीच न्हवतं...
अधीर त्या क्षणांमध्ये
मान्य आहे मला.....
पण वाढले होते श्वास तुझे
तसा धड-धडलो तर
मी ही होतो ...
सुंदर भावना
ReplyDeleteआभार 🙏🙏🙏
Delete