Tuesday, February 2, 2021

 जिंकून झालंय... हरून झालंय...

आयुष्याशी लढून झालंय....

विजयाचा जल्लोष करून...

कधी कोलमडून पडून झालंय....


वादळांना सांगा ...

आता फार फरक पडत नाही

न्यायचंय ते त्यांनी नेलंय...

द्यायचंय ते मी दिलंय....

देऊन झालंय...घेऊन झालंय...

आयुष्याशी लढून झालंय...


पूर्ण झाल्यात मनामधल्या,

खूप साऱ्या अभिलाषा....

काळरात्रिंचा अंत करत, 

सूर्याचं आरोहण झालंय....

नमुन झालंय... भजून झालंय....

आयुष्याशी लढून झालंय...




No comments:

Post a Comment

मैं अकेला

मेरे कल वाले मुझसे  कल मेरी मुलाकात हुई तो मैंने उससे उसकी  "खुशहाली" ...... पूछ ही ली... क्यों की मैं जानता था के वो चाहता था  के...