Wednesday, February 24, 2021

 एवढ्यात कोठे 

स्वप्नांना पंख होते आले..

आणि 

एव्हढ्यातच कोठे

आयुष्य हे जगण्याजोगते झाले..

माध्या:नीचा सूर्यही 

लगे पश्चिमेकडे गेला

खरच का

आता फार उशीर झाला....

Tuesday, February 2, 2021

 जिंकून झालंय... हरून झालंय...

आयुष्याशी लढून झालंय....

विजयाचा जल्लोष करून...

कधी कोलमडून पडून झालंय....


वादळांना सांगा ...

आता फार फरक पडत नाही

न्यायचंय ते त्यांनी नेलंय...

द्यायचंय ते मी दिलंय....

देऊन झालंय...घेऊन झालंय...

आयुष्याशी लढून झालंय...


पूर्ण झाल्यात मनामधल्या,

खूप साऱ्या अभिलाषा....

काळरात्रिंचा अंत करत, 

सूर्याचं आरोहण झालंय....

नमुन झालंय... भजून झालंय....

आयुष्याशी लढून झालंय...




 स्वप्नांचं ओझं ...

पापण्यांवर बांधून...

नाशीबाशी मी...

संधान साधून...

आयुष्याशी झगडतोय..

कधी जिंकतोय....

तर कधी...

कोलमडून पडतोय...

कधी तरी तुटतील...

जीवनाचे हे पाश....

याची वाट पाहत

कधी कधी जगतं...

तर कधी मरतं.....

ही वाट मी चालतोय..


अचानकच झाल्या स्पर्शाने त्या......
शहारली तर तु ही होतीस 
 नि घाबरलो तर मी ही होतो

 नसतीलच पाहिले भाव 
 चेहऱ्यावरचे माझ्या तू, 
 पण ....
जशी गोंधळलेली तू होतीस.... 
 तसा संभ्रमात तर मी ही होतो 

 झालं तर काहीच न्हवतं...
अधीर त्या क्षणांमध्ये
 मान्य आहे मला..... 
पण वाढले होते श्वास तुझे
 तसा धड-धडलो तर मी ही होतो ...

मैं अकेला

मेरे कल वाले मुझसे  कल मेरी मुलाकात हुई तो मैंने उससे उसकी  "खुशहाली" ...... पूछ ही ली... क्यों की मैं जानता था के वो चाहता था  के...