Monday, March 29, 2010

प्रारब्ध

एकतर आयुष्याच
गणितच जुळत नाही
बेरीज वजा गुणाकारात
बाकी काहीच ऊरत नाही

ठेवता किमती सुत्रांमधे
सुत्रच सारी बिघडत जातात
त्रिकोण चौकोण वर्तुळाचे
पायच सदा मोडत राहतात

टक्क्यंमधे अडकला तुका
मरेस्तोवर सुटत नाही....
बारमाही दुष्काळ शेतात
कधीच काही पीकत नाही

स्वप्नांचे खळे मग तो
करत राहतो मळ्यात
नकळत  समाजाच देण
फास होऊन येत गळ्यात...!!

No comments:

Post a Comment

मैं अकेला

मेरे कल वाले मुझसे  कल मेरी मुलाकात हुई तो मैंने उससे उसकी  "खुशहाली" ...... पूछ ही ली... क्यों की मैं जानता था के वो चाहता था  के...